बारी समाज भूषण डॉ. डी.डी. कोथळकर यांच्या निधनाबद्दल पारध येथे श्रद्धांजली सभा
बारी समाज भूषण डॉ. डी.डी. कोथळकर यांच्या निधनाबद्दल पारध येथे श्रद्धांजली सभा
पारध, ता. भोकरदन (महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी) – वालसावंगीचे सुपुत्र तथा बुलढाणा येथील ख्यातनाम बालरोगतज्ज्ञ डॉ. डी.डी. कोथळकर यांचे रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बारी समाजासह सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पारध शाहूराजे येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पारध (बस स्थानक परिसर) येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर दोन मिनिटे शांतता पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
सभेस माजी पंचायत समिती सभापती परमेश्वर पाटील लोखंडे, गणेश पाटील लोखंडे, संजय पाटील लोखंडे, एन. एम. लोखंडे यांच्यासह गावातील विविध समाजांचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. तसेच देवेंद्र बेराड, गणेश तेलंग्रे, सुनील बेराड, सागर देशमुख, राजेश बारी, गंगाराम तेलंग्रे, सुखदेव भुते, शिवराज तेलंग्रे, बबलू तेलंग्रे, महेंद्र बेराड सर, समाधान बोडखे, विजय राऊत, ज्ञानेश्वर बेराड, विशाल बेराड, रेवन भुते व समस्त बारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. कोथळकर यांनी आपल्या प्रदीर्घ वैद्यकीय सेवेतून असंख्य बालरुग्णांना उपचार व आधार दिला. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी राहिले असून त्यांच्या निधनाने एक सेवाभावी, कर्तृत्ववान आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

