Maharashtra

आमदार गोपीचंद पडळकरांचा क्रांतिकारी निर्णय;कोळगिरी तलावात पाणी सुटणार

आमदार गोपीचंद पडळकरांचा क्रांतिकारी निर्णय;कोळगिरी तलावात पाणी सुटणार.

ववळसंग (प्रतिनिधी): शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी धडपडणारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोळगिरी तलावात पाणी सोडण्याचा एक मोठा आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असून,स्थानिक शेतकऱ्यांनी या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून कोळगिरी तलावात पाणी सोडण्याची मागणी या भागातील नागरिक करत होते.मात्र,विविध तांत्रिक अडचणींमुळे हा प्रश्न प्रलंबित होता.

आमदार पडळकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या तलावात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

जत तालुक्याच्या पाणी प्रश्नावर ते ठाम असून “जतमध्ये पाणी पोहोचवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,”असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button