वळसंगमध्ये शिवजयंती उत्साहात; मुलींच्या लेझीम पथकाने जिंकली उपस्थितांची मने

वळसंगमध्ये शिवजयंती उत्साहात; मुलींच्या लेझीम पथकाने जिंकली उपस्थितांची मने
वळसंग (प्रतिनिधी)
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूलच्या संयुक्त विद्यमाने आज १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणात’ शालेय मुलींनी सादर केलेले भव्य लेझीम प्रात्यक्षिक सकाळी ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘जय भवानी,जय शिवाजी’च्या जयघोषात शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर झालेल्या मुख्य कार्यक्रमात दोन्ही शाळांतील विद्यार्थिनींनी पारंपरिक पोशाख परिधान करून लेझीमचा सराव सादर केला.अत्यंत शिस्तबद्ध हालचाली आणि लेझीमच्या कडकडाटाने संपूर्ण प्रांगण दुमदुमून गेले होते.
यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक,शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.”विद्यार्थ्यांमध्ये शिवरायांचे विचार आणि शिस्त रुजावी,या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,” असे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.या कार्यक्रमाचे कौतुक संपूर्ण वळसंग परिसरात होत आहे.
प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली.


