Maharashtra

वळसंगमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे थाटात उद्घाटन

प्रतिनिधी : ( वळसंग )
वळसंगमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे थाटात उद्घाटन

वळसंग येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते साठेनगरमधील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.या सोहळ्यात गावातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यात आली.

याप्रसंगी साठेनगरमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता आणि सोलर पंपद्वारे पाण्याची व्यवस्था अशा महत्त्वाच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. याशिवाय,वळसंगमध्ये ‘संत ज्ञानेश्वर वाचनालय’आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘उमेद’ बचत गट स्वतंत्र कार्यालयाचे उद्घाटनही आमदारांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमादरम्यान,कु.कृत्तिका अनिल कांबळे हिची आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) येथे निवड झाल्याबद्दल आमदार पडळकर यांच्या हस्ते तिचा विशेष गौरव करण्यात आला.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदारांचा सत्कारही करण्यात आला.

या सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य रमेश देवर्षी,पंचायत समिती सदस्य अप्पासाहेब बेडगे,युवा नेते शशिकांत पाटील यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button