Maharashtra

वळसंग येथे महाशिवरात्रीनिमित्त पार्वती माता व नंदीदेवाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न

वळसंग येथे महाशिवरात्रीनिमित्त पार्वती माता व नंदीदेवाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न

प्रतिनिधी : वळसंग
वळसंग (ता. जत) येथे महाशिवरात्रीचे औचित्य साधून पार्वती माता आणि नंदीदेव मूर्तींचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला.रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरात महाशिवरात्री साजरी होत असताना,वळसंग ग्रामस्थांनी या विशेष मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सकाळी ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात आणि विधीवत पूजेने सोहळ्याला सुरुवात झाली.यावेळी पार्वती माता आणि नंदीदेवाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली,ज्यामध्ये गावातील महिला व पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे संपूर्ण वळसंग परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

या सोहळ्यासाठी परिसरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वळसंग येथील उत्सव समिती व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

प्राणप्रतिष्ठापनेनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.

प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button