Maharashtra

विकसित भारताच्या दिशेने ठोस पाऊल; पिंपरी–चिंचवडमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण

भाजपा पिंपरी–चिंचवड शहरात केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपणपिंपरी–

चिंचवड | प्रतिनिधी
देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेला गती देणारा केंद्रीय अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केला. या ऐतिहासिक अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण भारतीय जनता पार्टी पिंपरी–चिंचवड शहराच्या वतीने शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या अध्यक्षतेखाली शहर मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.
या वेळी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या प्रचार–प्रसारासाठी पिंपरी–चिंचवड शहर संयोजक तसेच भाजपा शहर महामंत्री मधुकर बच्चे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. हा अर्थसंकल्प जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट बबनराव डांगले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशाच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडणारा हा अर्थसंकल्प पाहताना उपस्थितांमध्ये उत्सुकता, विश्वास आणि सकारात्मक अपेक्षा दिसून येत होत्या.
हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिक, युवक, शेतकरी व उद्योजकांसाठी नवी दिशा व आशा निर्माण करणारा असून विकसित भारताच्या दिशेने देशाला नेणारा ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास भाजपा पिंपरी–चिंचवड शहर महामंत्री मधुकर बच्चे, महामंत्री वैशाली खाडेय, मीडिया सेल प्रमुख सागर बिरारी, रोहिणी मांढरे, सीए बबन डांगले, सीए ज्योती वाघमोडे, सीए संतोष वळसनकर, सीए शैलेश बोरे, सीए अमोल इंगळे, सीए ईश्वर मणी, सीए अमोल बोरसे, सीए आदित्य मासुळकर, सीए राहुल तहलानी, सीए किशोर जसवानी, गायत्री तळेकर, महेश साळुंखे, सतपाल गोयल, युवराज लांडे, रवींद्र नांदूरकर, संजय परळीकर तसेच पिंपरी–चिंचवड महापालिकेचे नगरसेवक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button