तब्बल दहा वर्षांनंतर विनयभंग प्रकरणी आरोपीस सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा; पोलिसांच्या चिकाटीला मोठं यश
तब्बल दहा वर्षांनंतर विनयभंग प्रकरणी आरोपीस सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा; पोलिसांच्या चिकाटीला मोठं यश
पुणे : पुणे लोहमार्ग पोलिस ठाणे गु.रजि. नं. ३३८/२०१६ भा.दं.वि. कलम ३५४ (ड) मधील फिर्यादी मजकूर हया त्यांच्या मैत्रिणीसह उच्च शिक्षणानिमित्त तळेगाव ते कासारवाडी असा लोकल ने प्रवास करत होत्या आरोपी रमेश सदोरमल केसवानी वय 73 राहणार पिंपरी याने त्यांच्या जवळ जाऊन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत छेडछाड केली होती. याप्रकरणी फिर्यादीने पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली होती. त्यानंतर परिस्थितीजन्य पुराव्यासह दोषारोपपत्र मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, लोहमार्ग पुणे येथे दाखल करण्यात आले होते.
सदर गुन्हा होऊन १० वर्षांहून अधिक कालावधी लोटला होता. साक्षीदारांची विस्मृती झालेली असतानाही कोर्ट पैरोकार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक व सरकारी अभियोक्ता यांच्या संयुक्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे साक्षीदार व तांत्रिक पुरावे अबाधित ठेवण्यात आले. विशेष म्हणजे, पोलिसांनी अत्यंत संयम, चिकाटी आणि बारकाईने तपास करत पुराव्यांची साखळी मजबूत ठेवली. दीर्घ कालावधीनंतरही प्रकरण न्यायालयात प्रभावीपणे मांडण्यात पोलिसांनी दाखवलेली तत्परता व कर्तव्यदक्षता विशेष कौतुकास्पद ठरली.
सरकारी पक्षाचे श्रीमती अश्विनी काळे यांनी ०७ साक्षीदार तपासून भौतिक व मौखिक पुरावे सादर करत आरोपीविरुद्ध भक्कम बाजू मांडली. परिणामी, तब्बल १० वर्षांनंतर सुनावणीअंती मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी लोहमार्ग, पुणे (श्री. ए. जे. चव्हाण) यांनी आरोपीस सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा व २०००/- रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
ही उल्लेखनीय कामगिरी श्रीमती अश्विनी सानप मॅडम (मा. पोलिस अधीक्षक, लोहमार्ग पुणे), श्री रोहिदास पवार (मा. अपर पोलिस अधीक्षक, लोहमार्ग पुणे) व श्री रवींद्र गायकवाड (मा. उपविभागीय पोलिस अधिकारी) यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) नितीन चोगुले, सरकारी वकील अश्विनी काळे, तपासी अधिकारी सपोनि माने पाटील,पो.हवा. अमरदीप साळुंके, कोर्ट अंमलदार श्रेणी पोलिस उपनिरीक्षक हगवणे, पो.हवा ३४६ के.बी. गुरव, म.पो. 1385 एस.बी. केंद्रे, म.पो. 1315 यादव, पो.कॉ. ४74 मिडगुळे यांनी अत्यंत मेहनत व समन्वयातून साध्य केली आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणात न्याय मिळवून देण्यात पोलिसांनी दाखवलेली जिद्द आणि व्यावसायिकता समाजासाठी आदर्श ठरत आहे.
आजच्या धावपळीच्या युगात अनेक चांगल्या वाईट घटना घडत असतात. मात्र, कोणताही गुन्हा शिक्षा टाळू शकत नाही हे या प्रकरणातून पुन्हा अधोरेखित झाले असून, न्याय मिळवून देण्यात पोलिस यंत्रणेची भूमिका निर्णायक ठरली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429