सोरडीच्या सुपुत्राची ऐतिहासिक झेप; ‘इंडिया स्किल्स’मधील यशानंतर श्रेयस नरळे यांचा गावात नागरी सत्कार

सोरडीच्या सुपुत्राची ऐतिहासिक झेप; ‘इंडिया स्किल्स’मधील यशानंतर श्रेयस नरळे यांचा गावात नागरी सत्कार
वळसंग (प्रतिनिधी):
सोरडी गावचे सुपुत्र श्रेयस ज्ञानदेव नरळे यांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित IndiaSkills Competition 2025-26 स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत ‘इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स’ (Electrical Installations) क्षेत्रात रौप्य पदक (Silver Medal) पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे.
या देदिप्यमान यशाबद्दल सोरडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने संपन्न झाला.कौशल्याचा राष्ट्रीय ठसा
भारत सरकारच्या Skill India मोहिमेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत देशभरातील हजारो तरुणांनी सहभाग घेतला होता. श्रेयसने पश्चिम विभागीय (Western Region) स्पर्धेत आपल्या कौशल्याने परीक्षकांचे लक्ष वेधून घेत उपविजेतेपद पटकावले.
ग्रामीण भागातील एका तरुणाने राष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या नावाचा आणि राज्याचा डंका वाजवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रेयस नरळे यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी संपूर्ण गाव फुलांनी आणि फलकांनी सजले होते. श्रेयसच्या या यशाने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या सत्काराला उत्तर देताना श्रेयस म्हणाला की,”योग्य मार्गदर्शन आणि जिद्दीच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणही जागतिक दर्जाचे यश मिळवू शकतात.” या यशानंतर आता श्रेयसची पुढील वाटचाल WorldSkills India च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी असणार आहे.
या सोहळ्याला गावातील प्रतिष्ठित नागरिक,तरुण आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.श्रेयसचे हे यश केवळ त्याचे वैयक्तिक यश नसून संपूर्ण सोरडी गावाचा सन्मान असल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.
प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली.



