Maharashtra
सावरकरांना भारतरत्न दिल्यास पुरस्काराची प्रतिष्ठा वाढेल — मोहन भागवत

सावरकरांना भारतरत्न दिल्यास पुरस्काराची प्रतिष्ठा वाढेल — मोहन भागवत
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी पुन्हा अधोरेखित केली. सावरकरांना भारतरत्न प्रदान केल्यास देशातील सर्वोच्च नागरी सन्मानाची प्रतिष्ठा अधिक वाढेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा उल्लेख करत त्यांना योग्य सन्मान मिळावा, असे मत व्यक्त केले. “सावरकरांना भारतरत्न दिल्यास पुरस्काराची प्रतिष्ठाच वाढेल,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
