Maharashtra
पुनावळे येथे २४ व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू
पुनावळे येथे २४ व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू
पुणे – पुनावळे परिसरातील पेटकर सियोना सोसायटी येथे २५ वर्षीय वैभव सुतार याचा २४ व्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. तो मित्राच्या फ्लॅटवर गेला असताना ही घटना मध्यरात्री घडली.
प्राथमिक तपासात समोर आले की, वैभवने कुटुंबीयांना आयटी क्षेत्रात नोकरी करत असल्याचे सांगितले होते; मात्र प्रत्यक्षात तो मित्राच्या पोल्ट्री व्यवसायात मदत करत होता.
या प्रकरणी रावेत पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

