पुण्याला नवे नेतृत्व : मंजुषा नागपुरे महापौर, परशुराम वाडेकर उपमहापौर
पुण्याला नवे नेतृत्व : मंजुषा नागपुरे महापौर, परशुराम वाडेकर उपमहापौर
पुणे, दि. ८ फेब्रुवारी २०२६ (प्रतिनिधी): पुणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी, तर रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया (आठवले गट) चे परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.
मंजुषा नागपुरे या प्रभाग क्रमांक ३४ मधील नगरसेविका असून त्या सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून आल्या आहेत. ट्रॅफिक व्यवस्था सुधारणा, पूरसुरक्षा, आरोग्यसेवा आणि डिजिटल शिक्षण या विषयांवर विशेष भर देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
उपमहापौर परशुराम वाडेकर हे आरपीआयचे सक्रिय नेते आहेत.
नव्या नेतृत्वाकडून शहर विकास, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर प्रभावी उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
