पिंपरी चिंचवडमध्ये सोमवारी पाणीपुरवठा बंद; मंगळवारी कमी दाबाने पाणी
पिंपरी चिंचवडमध्ये सोमवारी पाणीपुरवठा बंद; मंगळवारी कमी दाबाने पाणी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका च्या पाणीपुरवठा विभागाकडून देखभाल व दुरुस्तीची अत्यावश्यक कामे हाती घेण्यात येणार आहेत. पाणीपुरवठा यंत्रणेतील तांत्रिक तसेच विद्युत विषयक दुरुस्तीच्या कामांसाठी सोमवार, दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी निगडी जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
या कामांमुळे पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये सोमवार संध्याकाळचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. तसेच मंगळवार, दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने व उशिरा होण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

