Maharashtra

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६ अंतर्गत भव्य महानाट्य “शिवगर्जना”.

पिंपरी चिंचवड :   पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६ अंतर्गत भव्य महानाट्य “शिवगर्जना” सादर करण्यात येणार आहे. या महानाट्याची रंगीत तालमी आणि तयारी अंतिम टप्प्यात असून नागरिकांमध्ये कार्यक्रमाबाबत उत्सुकता वाढली आहे.

या महानाट्यात तब्बल ३०० हून अधिक कलाकारांचा सहभाग असून उंट, घोडे आणि भव्य ऐतिहासिक सेटच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास जिवंत केला जाणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.

कार्यक्रम १७, १८ आणि १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. ठिकाण म्हणून निगडी येथील नियोजित महापौर निवास मैदान निश्चित करण्यात आले आहे.

या भव्य ऐतिहासिक महानाट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, पराक्रम आणि स्वराज्याची प्रेरणा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button