Maharashtra

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीवर नव्या सदस्यांची नियुक्ती.

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी विविध पक्षांकडून नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून महापालिकेतील राजकीय समीकरणांना नवे रूप मिळाले आहे. सत्ताधारी भाजपकडून सर्वाधिक सदस्यांची निवड करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे गट शिवसेनेकडूनही प्रतिनिधींना संधी देण्यात आली आहे.

भाजपकडून अभिषेक बारणे, शालिनीताई गुजर, मनिषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, शीतल वर्णीकर, कृष्णा सुरकुले, अर्चना कारंडे, मधुरा शिंदे आणि बाबासाहेब त्रिभुवन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे आणि विकास साने यांची निवड झाली आहे. तर शिंदे गट शिवसेनेकडून सुलभा उबाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्थायी समिती ही महापालिकेतील आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेणारी महत्त्वाची समिती मानली जाते. नव्या सदस्यांच्या नियुक्तीनंतर आगामी अर्थसंकल्पीय निर्णय, विकासकामे व प्रशासकीय धोरणांवर समितीची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button