पायाभूत सुविधा, उद्योग, आरोग्य, शेती व सामाजिक विकासावर भर; सरकारचा सर्वसमावेशक विकास आराखडा जाहीर
पायाभूत सुविधा, उद्योग, आरोग्य, शेती व सामाजिक विकासावर भर; सरकारचा सर्वसमावेशक विकास आराखडा जाहीर
देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि मानवी विकासाला गती देण्यासाठी सरकारने पायाभूत सुविधा, उद्योग, आरोग्य, शेती, शिक्षण, सेवा क्षेत्र आणि रोजगारनिर्मिती यांचा समावेश असलेला व्यापक विकास आराखडा जाहीर केला आहे. :
🔹 लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना ₹20,000 पर्यंत कर्ज (लोन) देण्याचा निर्णय; शेतीसाठी आर्थिक आधार
🔹 जामनगर येथील WHO केंद्राचे आधुनिकीकरण व अद्ययावत (अपडेट) काम हाती घेण्यात येणार
🔹 मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षित व सुसज्ज हॉस्टेलची उभारणी
🔹 आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न; जागतिक पातळीवर भारतीय परंपरेचा प्रसार
🔹 तीन नवीन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) उभारण्यात येणार
🔹 वेलनेस व योग क्षेत्रासाठी विशेष प्रशिक्षण योजना; एक लाख लोकांना ट्रेनिंग
🔹 सर्व्हिस सेक्टर मजबूत करण्यावर भर; आयटी, पर्यटन, लॉजिस्टिक्स, हेल्थ सर्व्हिसेसला चालना
🔹 सरकारकडून छोट्या कंपन्या व MSME कडून थेट सामान खरेदी
🔹 बँकिंग क्षेत्रात सुधारणा; कर्जप्रक्रिया अधिक सुलभ
🔹 जुने औद्योगिक क्षेत्र पुनर्जीवित करण्यासाठी लघु उद्योगांसाठी ₹7 हजार कोटी
🔹 MSME साठी ₹10 हजार कोटींचा विशेष निधी
🔹 इलेक्ट्रॉनिक उपकरण उत्पादनासाठी ₹40 हजार कोटींचे प्रोत्साहन पॅकेज
🔹 ३ नवीन केमिकल पार्क उभारले जाणार
🔹 नवीन रोजगारनिर्मितीवर विशेष भर
🔹 टियर-२ आणि टियर-३ शहरांचा सर्वांगीण विकास
🔹 वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट (ODOP) योजनेला प्रोत्साहन
🔹 ४ राज्यांना जोडणारा खनिज कॉरिडॉर विकसित होणार
🔹 २० नवीन राष्ट्रीय जलमार्ग उभारले जाणार
🔹 रिअल इस्टेटसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन होणार
हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प
🚄 पुणे–मुंबई रेल्वे सिटी हाय-स्पीड कॉरिडॉर
🚄 हैदराबाद–बंगळुरू हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर
या सर्व निर्णयांमुळे शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग, सेवा क्षेत्र आणि सामाजिक सशक्तीकरण यांचा समतोल विकास साधला जाईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

