NMMS परीक्षेत वळसंगच्या श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूलची बाजी; ८ विद्यार्थी उत्तीर्ण*
प्रतिनिधी : वळसंग
*NMMS परीक्षेत वळसंगच्या श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूलची बाजी; ८ विद्यार्थी उत्तीर्ण*
वळसंग (प्रतिनिधी):नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप (NMMS) परीक्षेमध्ये वळसंग येथील श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूलने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या निकालानुसार,विद्यालयाचे एकूण ८ विद्यार्थी या प्रतिष्ठित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.केंचराया प्रसारक शिक्षण मंडळ,वळसंग संचलित या विद्यालयातील एकूण १४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी ८ विद्यार्थ्यांनी गुणांची उच्च पातळी गाठली आहे.कु.सृष्टी विठ्ठल गुगवाड हिने १२० गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांची यादी व गुण:
१) कु. सृष्टी विठ्ठल गुगवाड (१२० गुण)
२) कु. पल्लवी शिवाजी जाधव (१०९ गुण)
३) कु. संचिता संभाजी चव्हाण (१०७ गुण)
४) कु. कल्याणी भीमा लोखंडे (१०५ गुण)
५) कु. गायत्री रमेश तेली (८८ गुण)
६) चि. पृथ्वीराज संजय काळे (८७ गुण)
७) कु. रोहिणी संतोष जाधव (८५ गुण)
८) चि. श्रेयस विजय हावगोंडी ७९ (गुण)
या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत दरवर्षी १२,००० रुपये एकूण ४८,००० रुपये शिष्यवृत्ती केंद्र सरकारकडून प्रदान केली जाते.
ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु हुशार विद्यार्थ्यांसाठी ही योजना एक मोठे वरदान ठरत आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.पालकांनीही विद्यालयाच्या दर्जेदार मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली.

