Maharashtra

निराधार अंध मुलींच्या विवाहासाठी वुई टुगेदर फाउंडेशनकडून निःस्वार्थ आर्थिक मदत

निराधार अंध मुलींच्या विवाहासाठी वुई टुगेदर फाउंडेशनकडून निःस्वार्थ आर्थिक मदत

किवळे येथे कार्यरत असलेली माई बाल भवन ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून अंध व अनाथ मुला-मुलींचे संगोपन करून त्यांना शिक्षण, रोजगार तसेच सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य देण्यासाठी कार्यरत आहे. या संस्थेमार्फत अंध अनाथ मुला-मुलींचे योग्य संगोपन केले जाते, त्यांना शिक्षण दिले जाते, काहींचे विवाह घडवून आणले जातात तर काहींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात, जेणेकरून भविष्यात त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये.
या सामाजिक कार्यात वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने वेळोवेळी शक्य ती निःस्वार्थ मदत केली जाते. माई बाल भवन संस्थेच्या वतीने नुकताच किवळे येथे दोन निराधार अंध मुलींचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाहासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च अपेक्षित असल्याने माई बाल भवन संस्थेने वुई टुगेदर फाउंडेशनकडे आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.
या आवाहनास प्रतिसाद देत वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी फाउंडेशनच्या सदस्यांना मदतीचे आवाहन केले. अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्यासह फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी एकत्र येत या दोन्ही नवविवाहित मुलींना २१,१११ रुपये रोख स्वरूपात आहेर देत त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या मदतीमुळे विवाह सोहळ्यास मोठा हातभार लागला असून माई बाल भवन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थित वऱ्हाडी मंडळींमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे, उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे-सपकाळे, खजिनदार दिलीप चक्रे, सल्लागार रवींद्र सागडे तसेच नंदकुमार वाडेकर, अनिल शिंदे, शंकर कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी, राजेंद्र महाले, सरिता कुलकर्णी, विलास कडेकर, दारासिंग मन्हास, सलीम सय्यद, सीता केंद्रे, सदाशिव गुरव, दिलीप पेटकर, के. रंगराव, धनराज गवळी, रमाकांत उजळंबकर, उदय कुलकर्णी, श्रीनिवास जोशी, श्रीरंग दाते, अर्जुन पाटोळे, एम. के. शेख, अपर्णा अष्टीकर, जावेद शेख, अनिल पोरे, झाकीर सय्यद, हनीफ सय्यद, राजेंद्र ताठे, रवी इंगळे, दत्तात्रय शेटे आदी सदस्यांनी या सामाजिक उपक्रमात आर्थिक मदतीचा पुढाकार घेतला.
माई बाल भवन संस्थेचे संचालक मधुकर इंगळे यांनी वुई टुगेदर फाउंडेशन व सर्व पदाधिकाऱ्यांचे या मोलाच्या सामाजिक सहकार्याबद्दल मनापासून आभार मानले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button