Maharashtra

नेवासा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे रविवार दिनांक ८ फेब्रुवारी, रोजी उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमुर्तींच्या हस्ते भूमिपूजन.

नेवासा : नेवासा तालुका न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा रविवार, दिनांक 8/2/2026, रोजी नेवासा शहरात पार पडणार आहे. या कार्यक्रमास उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमुर्ती, न्याय विभागातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

न्यायालयाच्या वाढत्या कामकाजाचा विचार करता, आधुनिक आणि सुसज्ज अशा नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येत असून, यामुळे न्यायप्रक्रियेला अधिक गती मिळणार आहे. वकील, पक्षकार आणि नागरिकांना याचा मोठा लाभ होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

या भूमिपूजन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रॅक्टिशनर बारचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण घावटे आणि नेवासा तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अजय रिंधे यांनी केले आहे.

प्रतिनिधी :  नेवासा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button