Maharashtra

मुंबई विमानतळावर दोन विमानांचे पंख एकमेकांना धडकले; मोठी दुर्घटना टळली

मुंबई विमानतळावर दोन विमानांचे पंख एकमेकांना धडकले; मोठी दुर्घटना टळली

मुंबई | प्रतिनिधी
दिनांक 3 feb 2026 .
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी एक गंभीर प्रकार घडला. ग्राउंडवर टॅक्सी करत असताना दोन प्रवासी विमानांचे पंख एकमेकांना धडकले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया आणि इंडिगो या दोन विमानांचे पंख टॅक्सीवेवर एकमेकांना घासले. ही घटना विमान पार्किंगकडे आणि धावपट्टीकडे हालचाल सुरू असताना घडली. दोन्ही विमानांमध्ये प्रवासी व क्रू मेंबर्स उपस्थित होते.
घटनेनंतर तात्काळ सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली असून संबंधित दोन्ही विमाने तपासणीसाठी ग्राउंड करण्यात आली आहेत. प्राथमिक पाहणीत विमानांच्या पंखांच्या टोकाला किरकोळ नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान, नागर विमानन महानिदेशालयाने (DGCA) या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले आहेत. टॅक्सींग प्रक्रियेदरम्यान समन्वयात चूक झाली का, याचा तपास सुरू असून एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि ग्राउंड स्टाफची भूमिका देखील तपासली जात आहे.
या घटनेमुळे काही काळ विमानतळावरील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला होता. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणत उड्डाण सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button