Maharashtra

*मिरा-भाईंदरमध्ये ड्रग्जचं जाळं उघड! अर्धा किलोहून अधिक गांजासह तस्कर गजाआड*

*मिरा-भाईंदरमध्ये ड्रग्जचं जाळं उघड! अर्धा किलोहून अधिक गांजासह तस्कर गजाआड*

मिरा रोड | प्रतिनिधी
मिरा-भाईंदर शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला पोलिसांनी जोरदार धक्का दिला आहे. भाईंदर पूर्व येथील नवघर पोलीस ठाणे हद्दीत गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका संशयिताला रंगेहात पकडण्यात आले. आरोपीकडून तब्बल ६५५.२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची बाजारभावानुसार किंमत ४९ हजार ६४३ रुपये इतकी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ४.४८ वाजता पिल हाइट्स इमारतीसमोरील खाडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे आढळले. तात्काळ कारवाई करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगल्याचे स्पष्ट झाले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव धर्मेंद्र त्रिलोक गुप्ता असे असून, त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, शहरात तरुणांमध्ये गांजाचे वाढते सेवन ही चिंताजनक बाब समोर येत आहे. अंमली पदार्थविरोधी पथकाने सक्त मोहीम हाती घेतल्याने वारंवार अशा कारवाया होत आहेत. तपासात अनेक विक्रेते तरुणांना लक्ष्य करून हा घातक माल पुरवत असल्याचे निष्पन्न होत आहे. शहराला ड्रग्जमुक्त करण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

प्रतिनिधी बाळकृष्ण परब

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button