Maharashtra

मिरा-भाईंदरमध्ये बेकायदेशीर ऑर्केस्ट्रा बारवर एमबीव्हीव्ही पोलिसांची कारवाई, अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई*

*मिरा-भाईंदरमध्ये बेकायदेशीर ऑर्केस्ट्रा बारवर एमबीव्हीव्ही पोलिसांची कारवाई, अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई*

मिरा रोड | प्रतिनिधी
मनोरंजनाच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायांवर मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाअंतर्गत कडक कारवाई सुरू केली आहे. मिरा-भाईंदर परिसरातील बेकायदेशीर ऑर्केस्ट्रा बारवर छापे टाकत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यानंतर अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्यात आली आहे.
झोन–१ अंतर्गत पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या ऑर्केस्ट्रा बारवर छापे टाकले. यामध्ये काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टार नाईट ऑर्केस्ट्रा बार, करावली ऑर्केस्ट्रा बार तसेच मीरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हाईट हाऊस ऑर्केस्ट्रा बार यांचा समावेश आहे.
तपासादरम्यान या आस्थापनांमध्ये बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम करून गैरकृत्ये चालवली जात असल्याचे उघड झाले. यानंतर पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार मिरा भाईंदर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
महापालिकेच्या नियमांनुसार अतिक्रमण विभागाने तिन्ही ऑर्केस्ट्रा बारमध्ये केलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई केली. या धडक कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर व्यवसायांना मोठा दणका बसला असून, भविष्यातही अशा कारवाया सुरूच राहतील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

प्रतिनिधी बाळकृष्ण परब

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button