लोहमार्ग न्यायालयाने पाकीटचोरास सुनावली शिक्षा
लोहमार्ग न्यायालयाने पाकीटचोरास सुनावली शिक्षा
पुणे : पुणे-लोणावळा लोकलमधील पाकीट चोरी प्रकरणात तब्बल चार वर्षांनंतर आरोपीस शिक्षा सुनावण्यात आली असून दामिनी पथकाच्या तत्परतेमुळे गुन्ह्याचा यशस्वी तपास पूर्ण झाला.
फिर्यादी दिपक भागुजी गायकवाड (रा. पुणे) हे पुणे ते लोणावळा लोकलने देहूरोड ते मळवली असा प्रवास करीत होते. गाडी तळेगाव स्थानकात आल्यानंतर आरोपी मलंग अर्जुन वादवाणी (वय ३४) व त्याच्या साथीदारांनी संगनमत करून फिर्यादी यांच्या पॅन्टच्या खिशातील वुडलँड कंपनीचे पाकीट चोरी करून पळून जात असताना दामिनी पथकातील पोलिस अंमलदार यांनी दि. २४ जुलै २०२२ रोजी
तळेगाव येथे आरोपीस रंगेहात पकडले.
या प्रकरणी आरोपी विरुध्द पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात
एफआयआर क्र. ३३०/२०२२ भा.दं.वि.
कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस अटक करून योग्य परिस्थितिजन्य व तांत्रिक पुराव्यांसह दोषारोपपत्र मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, लोहमार्ग, पुणे येथे सादर करण्यात आले. कोर्ट पैरवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सरकारी अभियोक्ता यांच्या सांघिक कामगिरीने सर्व साक्षीदार व तांत्रिक पुरावे अबाधित ठेवण्यात आले,
न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे अॅड. अश्विनी काळे यांनी साक्षीदारांची तपासणी करत भौतिक व परिस्थितीजन्य पुरावे प्रभावीपणे मांडले. त्याअनुषंगाने मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, लोहमार्ग, पुणे श्री. एन. जे. चव्हाण यांनी आरोपीस तीन महिने साधा कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दहा दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक (लोहमार्ग) श्रीमती अश्विनी सानप, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. रोहिदास पवार लोहमार्ग पुणे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन चोगुले, सरकारी वकील अश्विनी काळे, तपासी अंमलदार पो.ह.वा. १०५१ कदम तसेच कोर्ट अंमलदार पोलिस उपनिरीक्षक हगवणे, पोलिस हवालदार ३४६ के. बी .गुरव, म . पो.अ.१३८५ एस. बी .केंद्रे, पोलीस अंमलदार ४७४ मिडगुले आणि सहकारी यांनी यशस्वीपणे पार पाडली.
या प्रकरणातून ठोस पुरावे, साक्षीदारांचे सुसंगत जबाब आणि पोलिसांच्या काटेकोर तपासामुळे गुन्हेगारांना शिक्षा होऊ शकते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे -9822548429