लोणावळा पोलिसांचे मानवीय कार्य; मुंबई-पुणे महामार्गावरील ३० तासांच्या जाममध्ये अडकलेल्या प्रवाशांना दिला दिलासा
लोणावळा पोलिसांचे मानवीय कार्य; मुंबई-पुणे महामार्गावरील ३० तासांच्या जाममध्ये अडकलेल्या प्रवाशांना दिला दिलासा

मुंबई-पुणे महामार्गावर काल झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे जवळपास ३० तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या भीषण जाममध्ये अनेक प्रवासी, लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक अडकून पडले होते. दीर्घकाळ वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
या कठीण परिस्थितीत लोणावळा पोलिसांनी पुढाकार घेत मानवीय दृष्टिकोनातून मदतीचा हात पुढे केला. पोलिसांनी जाममध्ये अडकलेल्या प्रवाशांपर्यंत पोहोचून पाण्याच्या बाटल्या, स्नॅक्स व आवश्यक मदत साहित्य वाटप केले. तसेच नागरिकांना धीर देत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
सामान्यतः पोलिसांवर विविध कारणांनी टीका होत असते; मात्र अशा संकटकाळात पोलिसांनी केलेले संवेदनशील व सेवाभावी कार्य नागरिकांनीही लक्षात ठेवणे तितकेच गरजेचे आहे. लोणावळा पोलिसांच्या या तत्पर मदतीमुळे अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

