Maharashtra

करजगांव येथे संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी!

 

करजगांव येथे संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी!

दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी करजगांव येथे सर्व गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संत शिरोमणी गुरु रविदास जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
संत रोहिदास महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
गुरु रविदास यांच्या शिकवणी प्रमाणे गावामध्ये समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे , कर्मकांडापेक्षा कर्माला महत्त्व देणारे, समाजातील उपेक्षित घटकांना आत्मसन्मानाचा मार्ग दाखवणारे कार्य करण्याचे ठरले. गावामध्ये जिजाऊ सृष्टी प्रकल्प निर्माण करण्याचे ठरलेले असून त्यामध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचे सुद्धा एकमताने ठरलेले आहे.संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
त्यांचे विचार आजही समाजाला योग्य दिशा देणारे असून, समानतेवर आधारित समाजरचनेची प्रेरणा देतात. संत रोहिदास महाराजांचे विचार आपल्या जीवनात आचरणात आणून सर्वांनी एकत्र येऊन सुसंस्कृत, समताधिष्ठित आणि मानवतावादी समाज घडवूया.
या पावन जयंती निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!असे बोरशे गुरुजींनी कळविले आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष वरपे,ग्रामपंचायत सदस्य भास्कर सपकाळ,संतोष पाटील बोरसे, सुधाकर वरपे, धोंडीबा पाजगे, दिलीप बोरसे,समाधान मस्के, विशाल कानडे, प्रकाश सोनुने, अमोल सोनुने, राहुल बोर्डे, सखाराम लोखंडे, विनोद कानडे, रावसाहेब बोरसे, गोपीनाथ शिरसाट, गुलाब कानडे, कडुबा शेठ, नारायण सोनुने, अंकुश पाजगे,भगवान सोनुने,फकिरबा कानडे,संदिप सोनुने,योगेश सोनुने,आबा हिवरे,गणेश लोखंडे,पवन सोनुने,जीवन सोनुने,शुभम सोनुने.चंदु खरात,किसन फेपाळे,प्रियेश सोनुने,निखील सोनुने,सार्थक सोनुने,गोरख सोनुने.यांच्यासह गांवकरी हजर होते.

प्रतिनिधी महेंद्र बेराड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button