Maharashtra

केंद्रप्रमुखामुळे महिला शिक्षिकेची मानसिक त्रास मौदा पंचायत समिती प्रशासनावरही प्रश्नचिन्ह

केंद्रप्रमुखामुळे महिला शिक्षिकेची मानसिक त्रास मौदा पंचायत समिती प्रशासनावरही प्रश्नचिन्ह

मौदा तालुका प्रतिनिधी : नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत मौदा पंचायत समितीच्या तारसा केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल पत्रे यांच्यावर त्यांच्या अधिनस्त जि.प. प्राथमिक शाळा मांगली गोसावी येथील एका शिक्षक महिलेला मासिक त्रास देत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे या घटनेमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे
सदर महिला शिक्षिकेची सुमारे चार महिन्यांपूर्वी आंतरजिल्हा बदली झाली असून कार्यमुक्तीचा आदेश निघूनही अद्याप त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नसल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
तसेच काही शिक्षकांना त्यांच्या संपर्कामुळे कार्यमुक्त करण्यात आले असेही आरोप करण्यात आले आहेत मात्र संबंधित शिक्षिकेच्या बाबतीत हेतुपुरस्सर विलंब केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. कार्यमुक्ती बाबत वारंवार विचारणा करूनही केंद्रप्रमुख, अधीक्षक व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
या प्रकरणात मौदा तालुका प्रशासन संबंधित केंद्रप्रमुखांवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button