जत मधील तरुणाचा खून अनैतिक संबंधातून; दोघे अटकेत
जत मधील तरुणाचा खून अनैतिक संबंधातून; दोघे अटकेत
जत शहरातील मार्केट यार्ड परिसरात झालेल्या खुनाचा जत पोलिसांनी अवघ्या काही तासांतच उलगडा केला. अनैतिक संबंधाच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदारास बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
रोहित राजेंद्र माने (वय १९, रा. निगडी कॉर्नर, जत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत मल्लेश पुजारी व आरोपी यांच्यात काही दिवसांपासून वैयक्तिक वाद सुरू होता. या वादामागे अनैतिक संबंधांची पार्श्वभूमी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संशयित रोहित राजेंद्र माने याच्यासह त्याच्या अल्पवयीन मित्राला ताब्यात घेतले होते. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खून केल्याचे कबूल केले.
प्रतिनिधी :- संजय कोळी.जत/सांगली.
