Maharashtra

इंडस्ट्रीकडून राजपाल यादव यांना पाठिंबा

इंडस्ट्रीकडून राजपाल यादव यांना पाठिंबा

मुंबई : चेक बाउंस प्रकरणामुळे अडचणीत आलेले अभिनेते राजपाल यादव यांना बॉलीवूड इंडस्ट्रीकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या कठीण काळात सर्वप्रथम अभिनेता सोनू सूद यांनी मदतीचा हात पुढे केल्याची माहिती समोर आली आहे.
यानंतर सलमान खान, अजय देवगन आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांसारख्या कलाकारांनीही सहकार्य करण्याची तयारी दर्शवल्याच्या चर्चा आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांकडूनही यादव यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.
दरम्यान, इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांनी एकजूट दाखवत यादव यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे बोलले जात असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button