Maharashtra

हिंदू-बहुजनांचा बुलंद आवाज आमदार ‘गोपीचंद पडळकर’ यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती!*

*हिंदू-बहुजनांचा बुलंद आवाज आमदार ‘गोपीचंद पडळकर’ यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती!*

प्रतिनिधी : वळसंग
भारतीय जनता पार्टीने आपल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची पुनर्रचना केली असून, बहुजन समाजाचे आक्रमक नेतृत्व आणि आमदार गोपीचंद पडळकर यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आलीआहे.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज पक्षाच्या नव्या ‘पॉवरफुल’ टीमची घोषणा केली असून,यात पडळकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बहुजन नेतृत्वाचा सन्मान
गोपीचंद पडळकर यांनी सातत्याने धनगर आरक्षण, उपेक्षित समाज आणि हिंदू-बहुजनांच्या प्रश्नांवरून रान उठवले आहे.

विधान परिषदेत आणि सभागृहाबाहेरही त्यांनी मांडलेली आक्रमक भूमिका लक्षात घेऊन पक्षाने त्यांना प्रदेश पातळीवर महत्त्वाचे स्थान दिले आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पडळकर यांच्याकडे ही धुरा सोपवणे, हा भाजपचा ‘मास्टरस्ट्रोक’ मानला जात आहे.कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण या नियुक्तीची घोषणा होताच जत,सांगोला,आटपाडीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.

सोशल मीडियावर “हिंदू बहुजनांचा बुलंद आवाज”अशा टॅगलाईनसह आमदार पडळकर साहेब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या नव्या कार्यकारिणीत गोपीचंद पडळकर यांच्यासोबतच सुजय विखे पाटील,भारती पवार आणि अर्चना पाटील चाकूरकर यांचीही उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.तसेच,कृष्णराज महाडिक यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पक्षाने दिलेल्या या संधीमुळे आता गावपातळीवर भाजपची ताकद वाढवण्यासाठी आणि बहुजन समाजाला पक्षाशी जोडण्यासाठी पडळकर साहेब महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button