देहूरोड येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
देहूरोड येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
देहूरोड | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या देहूरोड येथील कार्यालयात महाराष्ट्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली सभेत उपस्थितांनी त्यांच्या कार्याची आठवण करून देत आदरांजली वाहिली.
या वेळी हिंदी भाषिक प्रदेश महासचिव श्री. रामनारायण शुक्ल जी, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. दीपक पांडे जी, दिनकर मिश्रा – पुणे जिल्हाध्यक्ष (हिंदी भाषिक), इर्शाद खान, वेंकटेश स्वामी, सुमित गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माननीय अजितदादा पवार यांनी राज्याच्या विकासासाठी घेतलेले निर्णय, त्यांची कार्यक्षमता, शिस्तप्रिय नेतृत्व व सामान्य जनतेशी असलेली नाळ याबाबत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली ठसा कायम स्मरणात राहील, असे यावेळी बोलताना सांगण्यात आले.
श्रद्धांजली कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे9822548429
