Uncategorized

चिंचवडगावात इतिहास जतन उपक्रम; चाफेकर बंधू पुतळा स्वच्छतेची मोहीम सुरू

नगरसेवक अनंत सुभाष कोऱ्हाळे यांच्या पुढाकारातून चाफेकर बंधूंच्या पुतळ्याची स्वच्छता; नियमित उपक्रमाची सुरुवात

चिंचवडगाव : येथील क्रांतिकारी चाफेकर बंधूंच्या पुतळ्याची धुवून स्वच्छता आज नगरसेवक अनंत सुभाष कोऱ्हाळे यांच्या पुढाकारातून करण्यात आली. इतिहास जतन व संवर्धनाच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.चाफेकर बंधू आणि चिंचवडगाव यांचा अतूट ऐतिहासिक वारसा असून, ते चिंचवडच्या शौर्य, अस्मिता व अभिमानाचे प्रतीक मानले जातात. परिसर स्वच्छ व सुशोभित ठेवण्याच्या संकल्पातून पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली.
दर १५ दिवसांनी हा उपक्रम नियमितपणे राबवण्यात येणार असून, लवकरच पुतळ्याच्या पॉलिशचे कामही हाती घेण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक कोऱ्हाळे यांनी दिली. “इतिहास जपणं हीच खरी आदरांजली,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button