Maharashtra

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पारध शाहूराजा येथे बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पारध शाहूराजा येथे बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

पारध शाहूराजा (महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी जि. जालना) : येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती स्नेहसंमेलनाच्या बक्षीस वितरण सोहळ्याने उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शर्मिला शिंदे-लोखंडे या होत्या. यावेळी श्रीमती मुदुला काळे, लता वानखेडे, प्रा. नारायण पाटील तसेच कार्यालयीन अधीक्षक विजयसिंह चंदनसे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याविषयी मनोगते व्यक्त केली. कु. ऋतिका लक्कस, कु. अदिती बोराडे, कु. रोहिणी लक्कस, कु. वैष्णवी लक्कस, कु. निशा भारती, कु. प्रगती लोखंडे, कु. तनुजा लोखंडे, कु. लक्ष्मी शिरसाट, कु. लक्ष्मी येडे, कु. लक्ष्मी डुकरे तसेच कु. ऋतुजा तबडे यांनी महाराजांच्या पराक्रम, शौर्य आणि आदर्श राज्यकारभाराची माहिती प्रभावी शब्दांत मांडली.

यानंतर स्नेहसंमेलनातील विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षकवर्गाने समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल बंकिमचंद्र लोखंडे यांनी केले, तर कु. रोहिणी लक्कस हिने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालय परिसरात शिवजयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button