छोट्या करदात्यांना दिलासा, ऑप्शन ट्रेडिंगवर कर वाढ; आयकर स्लॅबमध्ये बदल नाही
छोट्या करदात्यांना दिलासा, ऑप्शन ट्रेडिंगवर कर वाढ; आयकर स्लॅबमध्ये बदल नाही
केंद्र सरकारने करप्रणालीत काही महत्त्वाचे बदल स्पष्ट केले असून, यामध्ये छोट्या करदात्यांना मोठा दिलासा, तर शेअर बाजारातील ऑप्शन ट्रेडिंगवर कर वाढ झाल्याचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आयकर कायद्यानुसार, उशिरा रिटर्न भरणे, किरकोळ माहितीतील चूक किंवा तांत्रिक त्रुटी करणाऱ्या छोट्या करदात्यांवर फौजदारी शिक्षा न करता दंड (Penalty) आकारण्याची तरतूद आहे. सरकारचा उद्देश प्रामाणिक करदाते केवळ चुका झाल्यामुळे गुन्हेगार ठरू नयेत, हा आहे. मात्र जाणीवपूर्वक करचुकवेगिरी, बनावट कागदपत्रे किंवा मोठ्या रकमेची फसवणूक आढळल्यास कठोर कारवाई व शिक्षा केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, मोटार वाहन अपघातात मिळणारी नुकसानभरपाई (Motor Accident Compensation Claim) ही पूर्णपणे करमुक्त (Tax Free) असल्याची तरतूद कायम आहे. न्यायालय किंवा विमा कंपनीकडून मृत्यू, अपंगत्व किंवा दुखापतीसाठी मिळणारी ही रक्कम आयकराच्या कक्षेत येत नाही.
दुसरीकडे, शेअर बाजारातील ऑप्शन ट्रेडिंगवर कर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सट्टेबाजीला आळा घालण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सर्वसामान्य नोकरदार व मध्यमवर्गासाठी Income Tax Slab मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त करभार पडणार नाही.
सरकारचा एकूण उद्देश प्रामाणिक करदात्यांना दिलासा देणे आणि जोखमीच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे, असा आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे


