भारतीय बारी समाज नवनिर्माण संघटनेच्या जालना जिल्हाध्यक्षपदी व बारी समाज,पारध पंचमंडळ पदी महेंद्र बेराड सर यांची नियुक्ती*

भारतीय बारी समाज नवनिर्माण संघटनेच्या जालना जिल्हाध्यक्षपदी व बारी समाज,पारध पंचमंडळ पदी महेंद्र बेराड सर यांची नियुक्ती*
पारध (ता. भोकरदन, जि. जालना):
भारतीय बारी समाज नवनिर्माण संघटना यांच्या जालना जिल्हाध्यक्षपदी तसेच सूर्यवंशी बारी समाज पारध पंचमंडळी पदी महेंद्र बेराड सर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संघटनेचे अध्यक्ष मनीष भाऊ आस्वार, मराठवाडा विभागीय अध्यक्ष सुनील भाऊ उंबरकर तसेच मित्रपरिवार, नातेवाईक आणि बारी समाज बांधवांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महेंद्र बेराड सर हे पारधसारख्या ग्रामीण भागात वास्तव्यास राहून विविध शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. पत्रकार म्हणूनही त्यांनी परिसरातील सामाजिक व शैक्षणिक समस्या तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत नेहमीच ठामपणे आवाज उठवला आहे.
त्यांच्या या नियुक्तीमुळे पारध परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

