Maharashtra

आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचे निधन; राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोक.

सिल्लोड : राज्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचे निधन झाले असून सिल्लोड परिसरात शोककळा पसरली आहे. त्या सिल्लोड नगरपरिषदेच्या माजी अध्यक्षा होत्या.
नफिसा बेगम या गेल्या काही वर्षांपासून स्थानिक राजकारणात सक्रिय होत्या. सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. सिल्लोड शहरातील विविध विकासकामे, महिला उपक्रम आणि नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून सिल्लोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय असा मोठा परिवार आहे. अंत्यसंस्काराबाबतची माहिती कुटुंबीयांकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button