आळंदी रोडवर हनुमान कॉलनीतील लाईट डीपीला आग

आळंदी रोडवर हनुमान कॉलनीतील लाईट डीपीला आग
भोसरी जय महाराष्ट्र चौक, हनुमान कॉलनी येथे आज सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास एका लाईटच्या डीपीला अचानक आग लागली. डीपीमध्ये सलग मोठे स्फोटसदृश आवाज होत असल्याने आगीच्या ठिणग्या दूरवर उडाल्या आणि परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर पडले. काही वेळातच रस्त्यावर नागरिकांची गर्दी जमा झाली.
घटनेची माहिती देण्यासाठी नागरिकांनी MSEB कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र नेहमीप्रमाणे फोन व्यस्त असल्याने काही वेळ प्रतिसाद मिळाला नाही.
यानंतर स्थानिक नगरसेवक सागर गवळी यांना फोन करून माहिती देण्यात आली. त्यांनी व त्यांच्या बंधू किशोर गवळी यांनी तत्काळ MSEB च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना परिस्थिती कळवून आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. वेळेत उपाययोजना केल्यामुळे मोठा अपघात टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सध्या नगरसेवक सागर गवळी यांच्या सूचनेनुसार जुना डीपी काढून नवीन लाईट डीपी बॉक्स बसवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने अशा घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची मागणी व्यक्त केली आहे.
प्रतिनिधी -विजय अडसूळ
