
चेंबूरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून ६ मजूर जखमी, काहींची प्रकृती गंभीर
मुंबईतील चेंबूर येथील सुभाष नगर, एन.जी. आचार्य मार्ग परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत मोठी दुर्घटना घडली आहे. बिल्डिंग क्रमांक ३६ च्या पुनर्विकास कामादरम्यान सहा मजूर उंचावरून खाली पडले.
प्राथमिक माहितीनुसार, काही मजुरांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून सर्व जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. संबंधित विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
प्रतिनिधी सिंथीया कोरिया


