Maharashtra
सुनेत्रा पवार यांनी दिला राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. एकाच वेळी दोन सभागृहांचे सदस्यत्व ठेवता येत नाही, या घटनात्मक नियमामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी आपला राजीनामा संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.
राज्याच्या राजकारणात हा मोठा बदल मानला जात असून, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील वाटचाल कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे
