शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानची गडकोट मोहीम २०२६ ऐतिहासिक; ३ लाख ७५ हजार धारकऱ्यांचा सहभाग पुणे | प्रतिनिधी
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानची गडकोट मोहीम २०२६ ऐतिहासिक; ३ लाख ७५ हजार धारकऱ्यांचा सहभाग
पुणे | प्रतिनिधी

भिडे गुरुजी यांनी सुरू केलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने राबविण्यात आलेल्या “श्री लोहगड ते श्री भिगवड” गडकोट मोहिमेला २०२६ मध्ये अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. यंदा या मोहिमेत तब्बल ३ लाख ७५ हजार धारकरी सहभागी झाले होते. महाराष्ट्रासह देशभरातील विविध भागांतून तरुण-तरुणींनी या राष्ट्रकार्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या गडकोट मोहिमेचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता, ऐतिहासिक जपणूक तसेच शिवशंभूंचे विचार व संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा आहे. या उपक्रमामुळे तरुणांमध्ये देव, देश आणि धर्माबाबत जागृती निर्माण होत असून राष्ट्रभक्ती, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ होत आहे.
मोहिमेदरम्यान धारकऱ्यांनी श्री लोहगड ते श्री भिगवड या मार्गावरील विविध गड-किल्ल्यांवर श्रमदान करत स्वच्छता, दुरुस्ती व संवर्धनाची कामे केली. यासोबतच शिवकालीन इतिहास, शौर्यगाथा आणि स्वराज्याची मूल्ये समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या माध्यमातून शिवशंभूंच्या विचारांवर आधारित, संस्कारक्षम व राष्ट्रासाठी समर्पित अशी नवी पिढी घडवली जात असल्याचे मत या मोहिमेत सहभागी धारकऱ्यांनी व्यक्त केले. गडकोट मोहीम ही केवळ एक उपक्रम नसून, ती राष्ट्रीय संस्कारांची चळवळ असल्याचे अनेक मान्यवरांनी यावेळी नमूद केले.
२०२६ मधील “श्री लोहगड ते श्री भिगवड” ही गडकोट मोहीम महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणारी ठरली असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
— प्रतिनिधी : जीवन इंगळे

