प्रजासत्ताक दिनानिमित्त वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे सैनिक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
प्रजासत्ताक दिनानिमित्त वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे सैनिक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

|
चिंचवड
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन चिंचवड येथील यशस्वी क्लासेस हॉलमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन, तिरंगा ध्वजास सलामी व राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर फाउंडेशनच्या सहसचिव मंगला डोळे–सपकाळे व महिला समन्वयक अपर्णा कुलकर्णी यांनी “गर्जा महाराष्ट्र माझा” हे गीत सामूहिकरित्या सादर करण्यात आले.
या प्रसंगी फाउंडेशनच्या वतीने सैनिकांचा सत्कार करून त्यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे हे होते.
अध्यक्षीय भाषणात मधुकर बच्चे म्हणाले,
“सैनिक हा देशाचा अभिमान आहे आणि तो कायम राहील. माजी सैनिक निवृत्तीनंतरही समाजात देशसेवेच्या भावनेने सामाजिक कार्य करत असतात. त्यांच्या कर्तृत्वाचा, शिस्तीचा व अनुभवाचा समाजाला निश्चितच फायदा होतो. त्यामुळे अशा माजी सैनिकांना सन्मानाने मुख्य प्रवाहात ठेवणे ही समाजाची जबाबदारी आहे.”
यावेळी उपस्थित सैनिकांनी आपल्या भावना व्यक्त करत देशसेवेचे अनुभव सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सलीम सय्यद यांनी केले.
सूत्रसंचालन मंगला डोळे–सपकाळे यांनी केले.
या कार्यक्रमाला उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे, सल्लागार रवींद्र सागडे, खुशाल दुसाने, महिला समन्वयक अपर्णा कुलकर्णी, संस्थापक क्रांती कुमार कडूलकर, दारासिंह मन्हास, जावेद शेख, नंदकुमार वाडेकर, लता शिंदे, मेघना बेरी, दिलीप पेटकर, अर्जुन पाटोळे, विलास रासकर, सरिता कुलकर्णी, ओम सोनी, उदय कुलकर्णी, रोहिणी बच्चे, हनीफ सय्यद, अनिल पोरे, अनिल शिंदे, भावीन भंडारी, श्रावणी बच्चे, निलेश आकारे, शंकर कुलकर्णी, आसावरी बच्चे, विलास गटने, अशोक देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाचा समारोप फाउंडेशनचे सल्लागार खुशाल दुसाने यांनी आभार प्रदर्शनाने केला.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

