प्रभाग ५ मध्ये धनुष्यबाणाची उमेदवारी मिथुन धनंजय गजरे यांना जनतेचा आणि समाजाचा भक्कम पाठिंबा
पुणे भोसरी; प्रभाग ५ मध्ये धनुष्यबाणाची उमेदवारी
मिथुन धनंजय गजरे यांना जनतेचा आणि समाजाचा भक्कम पाठिंबा
प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिवसेना (शिंदे गट) कडून धनुष्यबाण या अधिकृत निवडणूक चिन्हावर मिथुन धनंजय गजरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सामान्य व कष्टकरी कुटुंबातून पुढे आलेले, उमदे व होतकरू तरुण म्हणून मिथुन गजरे यांची ओळख आहे.
ग्राउंड लेव्हलवर काम करण्याचा अनुभव, सामान्य माणसांशी थेट संवाद आणि परिसरातील सर्वसामान्य प्रश्नांची अचूक जाण यामुळे ते नागरिकांमध्ये विश्वासार्ह उमेदवार ठरत आहेत. राष्ट्रीय पक्षांचे आर्थिकदृष्ट्या व ताकतीने बळकट उमेदवार समोर असतानाही, कोणत्याही दबावाला न डगमगता गजरे आत्मविश्वासाने घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.
त्यांच्या साध्या व प्रामाणिक प्रचारशैलीला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून, “हा आपलाच माणूस आहे” अशी भावना अनेकांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे. यासोबतच, गजरे यांना त्यांच्या समाजाकडून मिळणारा भक्कम पाठिंबा ही त्यांच्या प्रचारातील महत्त्वाची जमेची बाजू ठरत आहे.
मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीरंग बारणे यांनी दाखवलेला विश्वास आणि धनुष्यबाणाची दिलेली उमेदवारी योग्य ठरते की नाही, हे येणारी वेळ सांगेल; मात्र सध्या तरी प्रभाग ५ मध्ये मिथुन गजरे यांचा प्रचार वेग घेताना दिसत आहे.
प्रतिनिधी -विजय अडसूळ
