प्रभाग १३ (क) मधून हिंदू महासभेचे ऋषिकेश (बापू) डापसे निवडणूक रिंगणात

नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६: प्रभाग १३ (क) मधून हिंदू महासभेचे ऋषिकेश (बापू) डापसे निवडणूक मैदानात; ‘वाडा संस्कृती’ जपण्याचा निर्धार
नाशिक :
नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, प्रभाग क्रमांक १३ (क) मधून अखिल भारत हिंदू महासभेचे अधिकृत उमेदवार ऋषिकेश (बापू) डापसे यांनी निवडणूक रिंगणात दमदार प्रवेश केला आहे. ‘नगारा’ या अधिकृत निवडणूक चिन्हावर ते मतदारांपर्यंत पोहोचत असून, स्थानिक प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून प्रचार करत आहेत.
डापसे यांनी आपल्या प्रचारात नाशिकच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशावर विशेष भर दिला आहे. नाशिकची ओळख असलेली, मात्र सध्या दुर्लक्षित होत चाललेली ‘वाडा संस्कृती’ जपणे आणि तिला नवसंजीवनी देणे, हा त्यांच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. पाणीटंचाईमुळे अनेक वाड्यांना कुलूप लावण्याची वेळ येत असल्याने, ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
डापसे यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधताना व्यसनमुक्त समाजनिर्मितीवरही भर दिला. माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी तसेच तरुण पिढीला व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि पंडित मदन मोहन मालवीय यांच्या राष्ट्रवादी विचारांचा वारसा पुढे नेत आपण निवडणूक लढवत असल्याचे डापसे यांनी नमूद केले. “राष्ट्रवाद, धर्म आणि संस्कृती यांचा सन्मान राखत प्रभागाचा विकास साधणे हेच आपले ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले.
मतदानाचा तपशील
प्रभाग: १३ (क)
उमेदवार: ऋषिकेश (बापू) डापसे
निवडणूक चिन्ह: नगारा
मतदान दिनांक: गुरुवार, १५ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा हिंदू महासभेने ताकदीने मैदानात उतरत आपली भूमिका स्पष्ट केली असून, ऋषिकेश (बापू) डापसे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग १३ (क) मध्ये निवडणुकीची चुरस वाढली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429
