Maharashtra

पारध बु. येथील विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पारध बु. येथील विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पारध बु. ( महेंद्र बेराड, भोकरदन तालुका प्रतिनिधी जि. जालना) येथील स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेचे प्रांगण विविध फुलांनी आकर्षकपणे सजविण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली. प्रजासत्ताक दिनाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ श्री. रामदास पांडुरंग लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी सभापती श्री. मनीषभैया श्रीवास्तव, श्री. विक्रांतभैया श्रीवास्तव, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, महावितरण विभागाचे कर्मचारी, पत्रकार बंधू, व्यापारी वर्ग, शेतकरी मित्र, पालकवर्ग तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व घटकांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button