*पारध बु. येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन*
*पारध बु. येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन*

पारध बु. ता. भोकरदन जि. जालना येथे स्व.हरिवंशराय बच्चन सेवाभावी संस्था, पारध बु. व लाल बहादूर शास्त्री सांस्कृतिक युवा क्रीडा मंडळ, पारध बु. यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्व.राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ.महाविद्यालय, पारध बु. आणि लॉयन्स नेत्र रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने स्व.शरदचंद्रजी हिरालालजी श्रीवास्तव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन पारध पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा. श्री माने साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी.जी. प.सभापती जालना श्री मनीष भैय्या श्रीवास्तव, सरपंच श्रीमती काकफळे, उपसरपंच श्री शेखर भैय्या श्रीवास्तव, व सर्व ग्रामपंचायत सदस्य,डॉ. खान, श्री जगदीश लोखंडे, श्री प्रताप आबा देशमुख, श्री ठाकूर सर, श्री समाधान तेलंग्रे, श्री कैलास दांडगे,श्री गजानन देशमुख. श्री आजहर पठाण संदीप क्षीरसागर, तसेच स्व.राजेंद्रजी श्रीवास्तव महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
डॉ. संदीप गायकवाड व त्यांच्या कर्मचारी वर्गाच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिराचा 340 लोकांनी लाभ घेतला गावातील अनेक नागरिकांनी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला.तसेच 35 लोकांचे तपासणीत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आढळलेल्या रुग्णांवर लायन्स नेत्र रुग्णालय येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या शिबिरामुळे गावातील गरजू वृद्ध व अपंग नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्री विक्रांत भैय्या श्रीवास्तव यांनी लायन्स नेत्र रुग्णालयाच्या डॉक्टर व कर्मचारी वर्गाचे आभार मानले.
प्रतिनिधी महेंद्र बेराड

