निवडणूक प्रचारासाठी डॉ. परसनाथ तिवारी पुण्यात; उत्तर भारतीय समाजाशी संवाद
निवडणूक प्रचारासाठी डॉ. परसनाथ तिवारी पुण्यात; उत्तर भारतीय समाजाशी संवाद

पुणे |
निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे हिंदी भाषिक प्रदेशाध्यक्ष डॉ. परसनाथ तिवारी मुंबईहून पुण्यात दाखल झाले. येरवडा गणेश विसर्जन घाट परिसरात आयोजित एका विशेष कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमास एनसीपी (अजित पवार गट)चे पुणे जिल्हाध्यक्ष व उत्तर भारतीय प्रमुख दिनकर मिश्रा हे उपस्थित होते.
यावेळी डॉ. परसनाथ तिवारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या उत्तर भारतीय समाजबांधवांशी
संवाद साधत, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाला बळ देण्याचे आवाहन केले. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)ला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमात बोलताना दिनकर मिश्रा यांनी सांगितले की, उत्तर भारतीय समाज नेहमीच विकासाभिमुख राजकारणाच्या पाठीशी उभा राहिला आहे. यावेळीही अजित पवार यांच्या नेतृत्वाला समाजाचा भक्कम पाठिंबा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429