निवडणूक ड्युटीतील पोलिसांना शिपायापेक्षा कमी मानधन? पोलिसांनी मानधन नाकारत उपस्थित केला सवाल
निवडणूक ड्युटीतील पोलिसांना शिपायापेक्षा कमी मानधन? पोलिसांनी मानधन नाकारत उपस्थित केला सवाल
निवडणूक ड्युटी दरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले मानधन शिपायाच्या मानधनापेक्षाही कमी असल्याचे निदर्शनास आले असून, याबाबत संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी मानधन स्वीकारण्यास नकार दिला आहे.
निवडणूक कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या मानधन यादीत
शिपायाला ₹1550
तर पोलीस कर्मचाऱ्याला केवळ ₹500 मानधन दाखवण्यात आले आहे.
ही बाब समोर येताच अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांची किंमत शिपायापेक्षा कमी आहे का?
पोलीस यंत्रणा नसल्यास निवडणुका शांततेत आणि सुरक्षिततेत पार पडू शकतील का?
निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे, दंगलसदृश परिस्थिती रोखणे, मतदार व निवडणूक कर्मचाऱ्यांची सुरक्षा करणे ही अत्यंत जबाबदारीची कामे पोलीस दल पार पाडत असते. अशा परिस्थितीत त्यांना दिले जाणारे अत्यल्प मानधन हे पोलीस दलाचा अपमान करणारे असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या अन्यायकारक मानधन धोरणाविरोधात संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करत मानधन नाकारले, ही बाब प्रशासनासाठी गंभीर इशारा मानली जात आहे.
याबाबत निवडणूक प्रशासनाने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानजनक व समतोल मानधन देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ह्या मुळे पोलिसांच्या मनावर परिणाम होऊ शकतो आणि
भविष्यात अशा दुर्लक्षा मुळे निवडणूक व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

