Maharashtra

NEET PG 2026 : कटऑफ थेट -40 गुणांपर्यंत खाली रिक्त PG सीट भरण्यासाठी NBEMSचा मोठा

NEET PG 2026 : कटऑफ थेट -40 गुणांपर्यंत खाली
रिक्त PG सीट भरण्यासाठी NBEMSचा मोठा निर्णय
नवी दिल्ली / मुंबई :
राष्ट्रीय वैद्यकीय परीक्षा मंडळाने (NBEMS) NEET PG 2026 साठी पात्रता (Qualifying) कटऑफमध्ये मोठा बदल करत आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी कटऑफ थेट -40 गुणांपर्यंत (0 परसेंटाइल) खाली आणला आहे. या निर्णयामुळे देशभरातील सुमारे 18 हजारांहून अधिक रिक्त PG वैद्यकीय सीट भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, या निर्णयावर वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, विविध वैद्यकीय संघटनांनी या निर्णयावर तीव्र टीका केली आहे. “हा निर्णय म्हणजे मेरिटचा ऱ्हास असून, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या दबावाखाली तो घेण्यात आला आहे,” असा आरोप डॉक्टर संघटनांकडून करण्यात येत आहे. कमी गुणांवर प्रवेश दिल्यास भविष्यात रुग्णसेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
या निर्णयामुळे रिक्त सीट्स भरण्याचा प्रश्न सुटणार असला, तरी वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर होणाऱ्या परिणामाबाबतची चर्चा आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button