Maharashtra

मोठी बातमी मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या १९ वॉशिंग मशीन जप्त; रहाटणी येथे भरारी पथकाची कारवाई

 

पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कडक अंमलात आणण्यात येत असून, ड क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली नियुक्त भरारी पथकाने रहाटणी येथील गणराज कॉलनी परिसरात मोठी कारवाई केली आहे.

सोमवार (दि. १२ जानेवारी २०२६) रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत मतदारांना वाटप करण्याच्या उद्देशाने आणलेल्या तब्बल १९ वॉशिंग मशीन जप्त करण्यात आल्या.

या प्रकरणी भरारी पथकाचे प्रमुख राहुल निकम यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सुरू आहे. निवडणूक काळात कोणत्याही प्रकारे मतदारांना प्रलोभन देण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button