Maharashtra

महाराष्ट्र सदन घोटाळा : छगन भुजबळ ED प्रकरणातून निर्दोष मुक्त

महाराष्ट्र सदन घोटाळा : छगन भुजबळ ED प्रकरणातून निर्दोष मुक्त

मुंबई, प्रतिनिधी | दि. २३ जानेवारी २०२६
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ED (अंमलबजावणी संचालनालय) विशेष न्यायालयाने भुजबळ यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशात स्पष्ट केले की, या प्रकरणाची मूळ ACB (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) केस २०२१ मध्येच रद्द झाली असल्याने, त्यावर आधारित PMLA (मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा) अंतर्गत दाखल केलेला खटला कायदेशीरदृष्ट्या टिकू शकत नाही. त्यामुळे ED चा संपूर्ण खटला रद्द करण्यात आला.
महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात कथित गैरव्यवहार आणि आर्थिक अपहाराचे आरोप ठेवत छगन भुजबळ यांच्यावर चौकशी सुरू करण्यात आली होती. या प्रकरणामुळे त्यांना दीर्घकाळ तुरुंगवासही भोगावा लागला होता. मात्र, ACB प्रकरणातच आरोप सिद्ध न झाल्याने आता ED प्रकरणालाही पूर्णविराम मिळाला आहे.
या निर्णयामुळे भुजबळ यांच्यावर गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याचा शेवट झाला असून, राजकीय वर्तुळात या निकालाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button