Maharashtra

मीरा-भाईंदरमधील मिठागर झोपडपट्टी पुनर्वसनाला गती; डोंगरी कारशेड रद्द होणार – मुख्यमंत्री

*मीरा-भाईंदरमधील मिठागर झोपडपट्टी पुनर्वसनाला गती; डोंगरी कारशेड रद्द होणार – मुख्यमंत्री फडणवीस*

येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुका या शहराच्या भवितव्याचा निर्णायक टप्पा असून, विकासासाठी नागरिकांनी भाजपला मतदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.
मीरा-भाईंदरमध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. ही निवडणूक कोणत्याही एका उमेदवाराची किंवा पक्षाची नसून, संपूर्ण मीरा-भाईंदरच्या भविष्यासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिठागर परिसरातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच, मीरा-भाईंदरला मुंबईशी अधिक सक्षमपणे जोडण्यासाठी कोस्टल रोड आणि सी लिंक उभारण्याची योजना राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पर्यावरणाच्या दृष्टीने वादग्रस्त ठरलेल्या दहिसर–भाईंदर मेट्रो रेल्वे मार्गिका क्रमांक ९ अंतर्गत प्रस्तावित डोंगरी कारशेड प्रकल्प रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मीरा-भाईंदरच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, आगामी काळात पायाभूत सुविधा, वाहतूक आणि नागरी सोयी सुविधांवर विशेष भर दिला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

बाळकृष्ण परब

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button