Maharashtra

*जनता विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

*जनता विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी*

पारध (महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी):
भोकरदन तालुक्यातील पारध येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवार (दि. १२) रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या प्राचार्या शर्मिला शिंदे लोखंडे, ज्येष्ठ शिक्षक रवी लोखंडे, प्रा. संग्रामराजे देशमुख, विजया कदम यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संग्रामराजे देशमुख यांनी केले.

या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थिनी दिपाली तेलंग्रे, प्रगती लोखंडे, आदिती बोराडे, प्रतीक्षा धनवई, भक्ती लोखंडे, तृप्ती देशमुख, मनिषा तबडे, रोहिणी तबडे, भाग्यश्री तबडे, लक्ष्मी क्षीरसाठ, लक्ष्मी ऐडे, श्रद्धा पोपळघट, ऋतुजा तबडे यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याचा प्रभावी आढावा आपल्या भाषणातून मांडला.

कार्यक्रमाला आर. ए. देशमुख, प्रा. एन. एन. पाटील, मृदुला काळे, प्रा. सुनील हजारे, ए. टी. सोनुने, लता वानखेडे, प्रा. सुनील पायघन, एस. पी. बैस, एस. डी. बोर्डे, प्रीतमसिंग मोरे, विजयसिंग चंदनसे, बंकिमचंद्र लोखंडे, महेश शेळके, बजरंग बिरादार, देविदास सुरडकर, नामदेव पवार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button